जामनेरात महिलेच्या पर्समधून ९० हजारांचा ऐवज लंपास

0

जामनेर | प्रतिनिधी
शहरासह परिसरात  चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून त्यांचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहावयास मिळला.गुरुवार दि.११ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शहरातील बस स्थानकावरील रसवंतीमध्ये बसून आपल्या गाडीची वाट पाहणा-या भाग्यश्री अमोल घुगे यांच्या पर्समधून मंगलपोत सहा हजार रूपयांची रोकड,एटिएम कार्ड,पॅन कार्ड असा सुमारे ९० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव येथे नातेवाईकांच्या लग्नाला जाऊन परत तळेगाव ता.जामनेर येथे जाण्यासाठी बस स्थानकावरील रसवंती वर इतर नातेवाईकांसह भाग्यश्री घुगे या बसलेल्या होत्या.तळेगाव जाण्यासाठी लागणा-या बसची वाट पाहणाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील ९० हजारांचा ऐवज लंपास केला. यापुर्वीही बस स्थानकावरील परीसरात लहान मोठ्या चो-यासह महिलेच्या गळ्यातील पोत ओढने आदि प्रकार घडलेले आहेत.शिवाय टवाळखोर पोरांचा घोळकांही ब-याचदा बस स्थानक परिसरात आढळून येतो. त्यासाठी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कायम स्वरुपी एक दोन कर्मचा-यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.याबाबत भाग्यश्री घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.