जामनेरात भरधाव रिक्षाच्या धडकेत दोन विद्यार्थिनी जखमी !

0

जामनेर : येथे शाळेत पायी जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थींनी जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. पुजा समाधान केंद्रे (वय-11) आणि पुनम समाधान केंद्रे (वय-14) असे या विद्यार्थिनींचे नाव आहे. दरम्यान त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पुजा केंद्रे व पुनम केंद्रे हे दोन्ही बहिणी असून त्या सकाळी शाळेत जात असताना मागून येणाऱ्या भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिली. यात दोन्ही गंभीररित्या जखमी झाल्या. दोघांना रस्त्यावरील नागरीकांना तातडीने जामनेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्राथमोपचार करून त्यांना जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात रिक्षाचालक रिक्षा घेवून फरार झाला होता. रामांनद नगर पोलीसांनी समाधान केंद्रे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.