जामनेरात बजरंगपुरा सह विविध ठिकाणी हनुमान जयंती साजरी..

0

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर येथे सालाबाद प्रमाणे  हया वर्षीसुद्धा परंपरा खंडित न करता बजरंगपुरा येथे हनुमान जयंती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते फुल हार घालून व पूजा करून मोजक्याच हनुमान भक्ता च्या उपस्थित हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

कारण कोरोनाने थैमान घातले असून लॉगडाऊन घोषित करण्यात आले आहे. आणि त्यातच सार्वजनिक कार्यक्रमाना बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु सालाबाद प्रमाणे सुरू असलेले कार्यक्रम खंडित न करता शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून आज  रोजी शहरातील बजरांगपूरा, शास्त्रीनगर, जामनेर पुरा, व इतर भागात मोजक्याच भक्तानी हनुमान जयंती साजरी करत पंरपरा कायम ठेवली.

या  वेळी समाधान वाघ, आतिष झाल्टे,अरुण जाधव,सदाशिव माळी,रवी बंडे , राहुल ठोंबरे , जितू माळी,सागर जाधव, मुकेश माळी ,निलेश पाटीलसर , कल्पेश माळी, दीपेश सोनवणे,चेतन बंडे, भीका सोनवणे ,अमोल शिंदे , अंकुश वाघ, अक्षय टहाकळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.