जामनेरातील मराठा वधु-वर परिचय मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

0

राज्य मराठा क्रांती मोर्च्यांचे राज्य समन्वयक विनोद पाटील यांनी केले मार्गदर्शन

जामनेर – जामनेर येथे सकल मराठा वधू वर परिचय मेळावा विशाल लाॅन्स & रिसाॅर्ट वर पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत जगतगुरु तुकोबाराय,राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवराय,छत्रपती शंभूराजे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर राजू पाटील (पाचोरा) यांनी जिजाऊवंदना सादर केली.यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विनोद पाटील,उद्योजक डी.डी.बच्छाव,बाळासाहेब सूर्यवंशी,आनंदराव मराठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत डी.एन चौधरी यांनी केले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक व मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की “वधु-वर परिचय मेळाव्यांतून अनेक विवाह जुळतील.समाजाला दिशा देण्याचं काम यानिमित्ताने होत आहे.मराठा आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात असून आपण ती नक्की जिंकू.तसेच मराठा समाजाने शिक्षणक्रांती व अर्थक्रांती केली पाहिजे.उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे.मुलींनी निर्व्यसनी व उद्योगी मुलांना साथीदार म्हणून निवडायला पाहिजे.

या कार्यक्रमाला जिल्हाभरातून प्रचंड संख्येने वधू-वर व पालकांची उपस्थिती होती.यावेळी ६०० वधू-वरांनी प्रत्यक्ष परिचय करून दिला.तर अनेकांनी यावेळी विवाह जोडणीच्या कामासाठी उपस्थिती देऊन या कामासाठी सहकार्य करण्याचा निर्धार केला.कार्यक्रमासाठी डी.एन.चौधरी यांनी विशाल लाॅन्स मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमातून जुळणाऱ्या पहिल्या विवाहास दशरथ पाटील केकतनिंभोरा यांचे कडून आर.ओ. मशीन भेट देण्यात येणार आहे.तसेच या प्रवीण गावंडे आणि देविदास ठुबे(प्रीतम स्टुडीओ) यांच्याकडून पहिल्या जुळणाऱ्या विवाहासाठी शूटिंग व फोटो अल्बम पूर्णपणे मोफत करून देण्यात येणार आहे.तसेच मुक्ताई ट्रॅव्हल्स यांच्याकडून कुलदैवताचे दर्शन फ्री देण्यात येणार आहे.उपस्थित सर्वांचे बायोडाटा संकलन करण्यात आले असून लवकरच पी.डी.एफ बुक तयार करून सोशल मिडीयावर शेअर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी सुनंदाताई पाटील,निताताई पाटील,डी.एन.चौधरी,प्रकाश पाटील,संजय गरुड,दिलीप खोडपे,जे.के.चव्हाण,डॉ.मनोहर पाटील,डी.के.पाटील,प्रमोद पाटील,चंद्रकांत बाविस्कर,डॉ.प्रशांत भोंडे,एस.टी.पाटील,राजमल भागवत,व्ही.पी.पाटील,तुकाराम निकम,सुरेश पाटील,ज्ञानेश्वर बोरसे,अमर पाटील,किशोर पाटील,डॉ.प्रशांत पाटील,डॉ.नंदलाल पाटील,डॉ.उमाकांत पाटील,राजू पाटील,कमलाकर पाटील,मनोज पाटील(जळगाव)प्रदीप गायके,संजय पाटील,एस.टी.चौधरी,विनोद पाटील,अमोल पाटील,अर्जुन पाटील,भगवान शिंदे,किशोर खोडपे,संदीप पाटील,सुनील गायकवाड,प्रवीण पाटील व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चौधरी यांनी सूत्रसंचालन विनोद पाटील,दीपक ढोणी यांनी तर आभार योगेश पाटील यांनी केले.या कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज जामनेर तालुका समितीने परिश्रम घेतले.तसेच सर्व सामाजिक संघटनां व समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.