जामनेरचे राजेंद्र सोनवणे “पद्मा अवार्ड”पुरस्काराने सन्मानित

0

जामनेर (प्रतिनिधी) :- येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जगन्नाथ सोनवणे यांना “माझे सरकार” यांचे ऑनलाईन वेबसाईटवर नव्वद सेकंदात दहा प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. माझे सरकार यात सहभागी झाले म्हणून त्यांना उत्कृष्ट “पद्मा अवार्ड 2019″पुरस्काराने मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

त्यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील उपस्थित होते.राजेंद्र सोनवणे त्यांचे संस्थेचे अध्यक्ष,सचिव, संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.