जानकीनगरात भीषण आग

1

८ संसाराची राख, सिलेंडरचा स्फोट
जळगाव, दि.१ –
शहरातील तुकारामवाडी परिसरात असलेल्या जानकीनगरमध्ये गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत अंदाजे ८ घरे खाक झाली असून अद्यापही आग सुरूच आहे. दरम्यान, एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
जानकीनगर परिसरात लाकडी पार्टिशन आणि पत्रे असलेली घरे आहेत. गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. काही वेळातच एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील तरुणांनी धाव घेत मिळेल तिथून पाणी आणून आग विझविण्यास सुरुवात केली.
घटनास्थळी आ.राजूमामा भोळे, महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, सुनील महाजन आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे

1 Comment
  1. Nayan sanjay salunke says

    Sagle paristithi kade laksh detayet pan madat declare keli ka koni…

Leave A Reply

Your email address will not be published.