जळगाव वाङे बस सुरु करण्याची मागणी

0

भङगाव येथे दि. २५ रोजी ऊषाबाई परदेशी उपोषणास बसणार
भङगाव | प्रतिनिधी
जळगाव ते वाङे मुक्कामी व सायंकाळची बस फेरी सुरु करावी.भङगाव ते वाङे सकाळसह बसफेर्या नियमीत सुरु ठेवाव्यात.या मागणीसाठी भङगाव तालुक्यातील वाङे येथील ग्रामपंचायत सदस्या ऊषाबाई अशोक परदेशी या भङगाव तहसिल कार्यालयासमोर दि. २५/२/२०१९ रोजी सकाळी ११ वाजेपासुन आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदनाच्या प्रती ऊषाबाई परदेशी यांनी भङगाव बसस्थानक, पाचोरा आगारप्रमुख , राज्याचे परीवहन मंञी आदिंना दिलेल्या आहेत. राज्याचे परीवहन मंञी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, जळगाव ते वाङे एस टी बस फेर्या सुरु कराव्यात. या मागणीनुसार मुक्कामी व सायंकाळ अशा २ बस फेर्या सुरुही झाल्या होत्या. या बस सेवामुळे वाङे, टेकवाङेबु, नावरे,बांबरुङ प्र. ब, सावदे, घुसर्ङी,लोण, बोरनार,निंभोरा,कनाशी,देव्हारी, बोदर्ङे,कोठली, दलवाङे, नवे वङधे, जुने वङधे, भङगाव आदि तालुक्यातील १७ ते १८ गावांच्या नागरीकांची प्रवासासाठी मोठी सोय झाली होती. माञ पाचोरा आगाराने ही बस काही वर्षापासुन अचानक बंद केलेली आहे.त्यामुळे जळगावी जाणार्या प्रवाशांना ञास सहन करावा लागत आहे. वारंवार बस सुरु करण्याबाबत निवेदनेही दिली.माञ एस टी महामंङळाचे दुर्लक्ष होत आहे.असेही निवेदनात नमुद केले आहे.भङगाव पंचायत समितीच्या दि. ३१/१/२०१९ रोजी आमसभेतही ही बस सुरु करण्याबाबत मागणी मांङण्यात आली.पाचोरा आगार प्रमुख वाणी साहेब यांनी ८ दिवसात जळगाव ते वाङे बस मुक्कामे सुरु करु असे आश्वासनही आमदार किशोर पाटील, आमदार ङाॅ. सतीष पाटील यांचे समोर दिलेले आहे.तसेच पाचोरा व भङगाव आगारास दि. ५/२/ |२०१९ रोजी हे निवेदन देउन दखल न घेतल्यास प्रवाशांसह उपोषणाचा मार्ग अवलंबवु असा ईशारा दिला होता. बस सुरु करणेबाबत आश्वासन देउनही जळगाव ते वाङे मुक्कामे व सायंकाळची बस सुरु झालेली नाही. ही बस सेवा तात्काळ सुरु करावी.व भङगाव ते वाङे सकाळसह बस फेर्या नियमीत सुरु ठेवाव्यात. या मागणीसाठी भङगाव तहसिल कार्यालयासमोर दि. २५/२/२०१९ रोजी सोमवारी सकाळी ११ वाजेपासुन आमरण उपोषणास बसत असल्याचेही शेवटी निवेदनात नमुद केले आहे.या निवेदनावर ऊषाबाई परदेशी यांची सही आहे.या निवेदनाच्या प्रती राज्याचे परीवहन मंञी ना. दिवाकर रावते, आमदार किशोर पाटील, जळगाव बसआगार, पाचोरा आगार प्रमुख, भङगाव तहसिलदार, पोलीस निरीक्षक . भङगाव पोलीस स्टेशन, भङगाव बसस्थानक प्रमुख आदिंना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.