जळगाव: जिल्ह्यात ”ब्रेक द चेन” अंतर्गत काय चालू आणि काय बंद, वाचा

0

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. याला ‘ब्रेक द चेन’ असे नाव दिले आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यांनी आज मंगळवारी (दि.६) नवीन निर्बंध लागू केले आहेत. या संबंधीचे आदेश आज काढण्यात आले. हे नवीन निर्बंध ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.

जिल्ह्यात कलम १४४ ची अंमलबजावणी व रात्री संचारबंदी, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू राहील. या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, अनावश्यकरीत्या कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय शहरात व गावात शिरू नये वा फिरू नये व त्यांनी त्यांच्या घरात वास्तव्य करावे. संचारबंदी कालावधीत वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा यांना हालचाल करण्यास कुठल्याही निर्बंधाशिवाय परवानगी राहणार आहे.

काय सुरु काय बंद राहणार?

हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडीकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक
किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य दुकाने (सर्व आठवडे बाजार बंद राहतील)

– सर्व मनोरंजन पार्क, बगीचे, नाटयगृहे, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक मैदाने हे रात्री 08.00 ते सकाळी 07.00 पावेतो बंद राहतील. तसेच शुक्रवारी रात्री 08.00 ते सोमवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहतील.
– सर्व Non- Essential दुकाने, मार्केट व मॉल्स मधील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व प्रकारचे दुकाने बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने हे सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन सुरु राहतील.
– सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर योग्य प्रकारे मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्तीवर रुपये 500/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणा-या व्यक्ती तसेच वाहन चालकावर प्रत्येकी रुपये 500/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– को ऑपरेटीव्ह , पीएसयु व खाजगी बैंक, BSE/NSE, विज वितरण कंपनी, टेलीकॉम सेवा पुरवठादार, विमा/मेडीक्लेम कंपनी, औषधी वितरण / निर्मिती संबंधित कार्यालये वगळून इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील (आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) 50% कर्मचारी यांच्या उपस्थितीतीबायत कार्यालय प्रमुख यांनी कोविड-19 प्रोटोकॉल नुसार निर्णय घ्यावा.
-विज, पाणी , बैंकिंग व इतर वित्तीय सेवा देणारे कार्यालये 100% अधिकारी /कर्मचारी क्षमतेसह सुरु राहतील.
-सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील बैठका एकाहून अधिक कार्यालयाशी संबंधित असतील तर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात.
– खाजगी वाहने व खाजगी बसेस यांना दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 07,00 ते रात्री (08.00 वाजेपावेतो वाहतूक करता येईल. तसेच दिनांक 05 एप्रिल, 2021 पासून तेदिनांक 30 एप्रिल, 2021 पावेतो शुक्रवार रात्री 08.00 वाजेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपावेतो अत्यावश्यक कारणाच्यतिरीक्त वाहतूक करण्यास मनाई असेल.
– सर्व सिनेमा हॉल्स, ड्रामा थिएटर्स, सभागृहे, मनोरंजन पार्कस/ आ्केड्स/ व्हिडीओ गेम पार्लर, वांटर पार्क,क्लब स्विमोग पूल, जिम व स्पोर्ट कॉम्प्लेक्सेस बंद राहतील.
सर्व रेस्टॉरंट, हॉटेल्स व बार बंद राहतील. (अपवाद जे रहिवासी हॉटेलचे अविभाज्य भाग आहेत.)
– सर्व रेस्टरेट/हॉटेल्स मानकांना टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलीव्हरी सुविधा या केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल. तसेच शनिवार व रविवारी केवळ सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत होम डिलीव्हरी सुविधा देता येईल. (म्हणजेचं कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर ऑर्डर देण्यास किंवा घेण्यास येता येणार नाही.)
-सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे हे बंद राहतील.
– धार्मिक स्थळावर नियमित पूजा-अर्चा करणा-या व्यवतीनी त्यांची नियमित पूजा-अर्चा ही कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश न देता सुरु ठेवावी.
– केशकर्तन शॉप / स्पा/सलून /ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना बंद राहतील.
-सर्व वृत्तपत्रांना वितरण व छपाई करता येईल.
– सर्व वृत्तपत्रे हे दररोज सकाळी 07.00 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत वितरीत करता येतील.
-सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये बंद राहतील.
-तथापि इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेस सुट राहील. परीक्षेचे कामकाज पाहणारा कर्मचारी वर्गाने एकतर लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.असे प्रमाणपत्र 48 तास वैध राहील.
-सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील.
– कोणत्याही विद्यार्थ्यास परिक्षेस उपस्थित राहण्यासाठी सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 व शुक्रवार ते सोमवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 वाजे दरम्यान परिक्षा केंद्राच्या ठिकाणी व घरी जाण्यासाठी वैध असलेले प्रवेशपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
-सर्व प्रकारचे धार्मिक/ सामाजिक/ राजकीय / सांस्कृतीक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी असेल,
-ज्या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत त्या जिल्ह्यांच्या बाबतीत मेळाव्यासाठी या अटीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल-
-कोणत्याही राजकीय मेळाव्यास भारत निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सुचनेनुसार बंदीस्त सभागृहात 50 % लोक किंवा 50 % क्षमतेसह आणि मोकळया जागेत 200 लोक किया 50% समतेसह कोविड-19 नियमावलीचे पालन करुन परवानगी असेल.
– लग्न समारंभ हे 20 लोकांच्या उपस्थितीत साजरा करता येतील.
– तसेच मॅरेज हॉल मधील कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे किंवा RTPCR चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
-कोविड -19 लसीकरण करुन न घेतलेले व कोविड-19 RTPCR चाचणी निगेटीव्ह रिपोर्ट नसलेले कर्मचा-यांवर रुपये 1000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापना यांचेवर देखील रुपये 10000/- मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-विक्रीच्या जागेवर खाण्यासाठी कोणासही खाद्यपदार्थांची ब्रिकी करता येणार नाही. तसेच विक्रीसाठीचे पदार्थ झाकून ठेवण्यात यावे. तथापि पार्सल किंवा होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या वेळेत देता येईल.
– बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे अशाच टिकाणचे बांधकामे सुरु राहतील,
-कामगारांना ये-जा करण्यास बंदी राहील. तथापि बांधकाम साहित्याची ने-आण करण्यास मुभा राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.