गिरणा नदीला उदया सुटणार पिण्याच्या पाण्याचे आवर्तन.

0

भडगाव- प्रतिनिधी : गिरणा धरणात सध्या ४७.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा धरणातुन उदया दि. ७ रोजी सकाळी ६ वाजता गिरणा नदीला एकुण १५०० क्युसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी गिरणा नदीच्या पाञात फिरु नये.

सतर्गता बाळगावी. नागरीकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन नागरीकांना नाशिक पाटबंधारे विभागाचे गिरणा धरण शाखाअभियंता एस. आर पाटील, उपविभागीय अभियंता एच व्ही पाटील , कार्यकारी अभियंता ङी बी बेहरे यांनी पाटबंधारे विभागामार्फत केलेले आहे. यामुळे गिरणा काठालगत गावांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा, शेती सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.