जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; ९८३ नवे रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सतत वाढ होत असून आज रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ९८३ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे.  दरम्यान आज ४४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. चिंतेचा विषय असा की, आज ६ रुग्णांचा उपचारदरम्यान, मृत्यू झाला आहे.

आजच्या कोरोना रिपोर्टनुसार आजवर जिल्ह्यात एकुण ६६ हजार ७२६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५९  हजार ५८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार ७२५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.  आज ०६  रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा १४२१ वर गेला आहे.

असे आढळले रूग्ण

जळगाव शहर – २२२, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ-५७, अमळनेर-५८, चोपडा-१३३, पाचोरा-१७, भडगाव-१५, धरणगाव-७१, यावल-१३, एरंडोल-२, जामनेर-१६३, रावेर-३२, पारोळा-३०, चाळीसगाव-१०२, मुक्ताईनगर-२४, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातून ९ असे एकुण ९८३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.