जळगावात किरकोळ कारणावरून हाणामारी ; दोघे जखमी

0

जळगाव  | शहरातील बी.जे. मार्केटमध्ये किरकोळ भांडणावरून एकाने चाकूने वार केल्याची घटना आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली.

शकील शहा नसीर शहा वय 55 रा. जोशी पेठ आणि शेख तय्यार शेख अकबर वय 41 रा. बीजे मार्केट जळगाव यांच्यात सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली. यात दोघे जखमी झाले असून दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत अद्याप पर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.