जळगावमध्ये पेट्रोल शंभरीपार

0

जळगाव : सततच्या पेट्रोल आणि डीझेल दर वाढीने जळगाव शहरात पेट्रोल शंभरीपार गेले आहे. रविवारी पेट्रोलचे एका लीटरचे दर १०० रुपये चार पैसे झाले आहेत. जळगावातील पेट्रोलच्या दराचा हा सर्वकालिन उच्चांक आहे.

लॉकडाऊनमुळे लोक आधीच समस्येने ग्रासलेले आहेत. बर्‍याच जणांचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत कमी झालेला असतांनाच आता पेट्रोल वाढीमुळे लोकांना फटका पडणार असल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आणि वाढलेल्या किंमती कमी होत नसल्याचा आधीचा अनुभव असल्यामुळे आता जळगावकरांना पेट्रोलसाठी शंभर रूपयेच मोजावे लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी हे दर ९९ रुपये ८७ पैसे झाले होते. शनिवारी रात्री त्यात १७ पैशांची वाढ झाली आणि हे दर शंभरीपार करून गेले. रविवारी दर शंभरीपार झाल्यामुळे पेट्रोल वापरणाऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता तरी केंद्र आणि राज्य सरकारांनी पेट्रोल, डिझेलवरील करांचा बोझा कमी करावा आणि दरावर नियंत्रण आणावे अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.