जळगांवकर नागरिकांचे राष्ट्रपती महोदयांना निवेदन

0

प्रज्ञा सिंग चा निषेध व उमेदवारी रद्द ची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
भोपाळ मधून भाजप तर्फे लोकसभेची उमेदवार श्रीमती प्रज्ञा सिंग ठाकूर यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन जलगावकर नागरिकानी मा जिल्हाअधिकारी जळगाव यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना देण्यात आले त्यात मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रज्ञा सिंग ची उमेदवारी रद्द करण्याची व त्यांचा जामीन ज्या कारणा साठी देण्यात आला आहे ते कारण आता नसल्याने जामीन सुद्धा रद्द करण्याचे आदेश संभधीताना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे
जिल्हा अधिकारी यांचे प्रतिनिधी गृह विभागाचे प्रमुख रवी मोरे यांनी हे निवेदन स्वीकारले असून ते आपल्या भावना सह ते त्वरित पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले
सर्व प्रथम जिल्हा अधिकारी कार्यालयात सर्व नागरिक जमा झाले प्रा शेखर सोनाळकर यांनी पाश्वभूमी स्पष्ट केली.मानियार बिरादारीचे अध्यक्ष व या समितीचे समनव्यक फारूक शेख यांनी निवेदनाचे सामूहिक वाचन केले.
फक्त एका तासा पूर्वी केलेल्या व्हॉट्सअप ग्रुप च्या माध्यमाने विनंती केली असता पुष्कळ मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती
यांची होती उपस्थिती
प्रा शेखर सोनाळकर, प्रा डॉ सि पी लभाणे, प्रा देवेंद्र इंगळे,फारूक शेख,करीम सालार,सौ वासंती दिघे,सौ वैशाली पाटील,अंजुम रिझवी,रईस बागवान,अश्फाक पिंजारी,सतीश सुर्वे,ऍड इम्रान हुसेन,डॉ रिझवान खाटीक,ऐनोद्दीन शेख,नईम शेख(लकडावाला) ताहेर शेख,अब्दुल रउफ, मुकेश पाटील,सीताराम देवरे,सुधाकर पाटील,साबीर शाह,दानिश अहेमद,कासीम उमर,फहिम पटेल,नईम खाटीक, रहीम तडवी,पीयूष तोडकर, सय्यद हारून,आकाश चौधरी,विकास पाटील,फिरोज पिंजारी,मुझ्झामिल शेख,हारून शेख,अन्वर शेख,सलमान खाटीक,मझहर पठाण,रियाझ काकर,कौसर शेख,सुभाष कोळी,शफी पेंटर,मोहम्मद शफी,रफिक मजीद,वसीम शेख, आदी उपस्थित होते व त्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.