जय श्रीराम’ च्या जयघोषात श्रीराम नवमी उत्साहात साजरी 

0
विविध धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रेत भाविक सहभागी 
जळगाव ;-  जय श्रीरामाच्या जयघोषात आज राम नवमीनिमित्त रविवारी शहरातील विविध धार्मिक संस्था, मंदिरे, विविध संस्था, संघटनांतर्फे रामनवमी मोठ्या उत्साहात व भक्तिमय  वातावरणात साजरा करण्यात आला . विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यात विविध धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रा प्रतिमा पूजनासह महाप्रसादाचे देखील ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते .  यानिमित्त श्रीराम मंदिरांची सजावट व रोषणाई करण्यात येऊन  दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सवाचे ही आयोजन करण्यात अाले होते . यावेळी भाविक भक्तांनी राम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन भक्तिमय वातावरणात जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला .
श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा 
सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे जळगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली . शाेभायात्रेत विविध मंडळे, संस्था, संघटना सहभागी झाल्या होत्या . या शोभायात्रेत  पारंपरिक वाद्य, नृत्य, वेषभूषा आखाड्यासह साहसी क्रीडा प्रकार व सजीव देखावे  सादर करण्यात आले . या शोभायात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले . विविध संस्थांतर्फे शोभायात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात येत होते . यावेळी जयश्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता . दुपारी ३.३०वाजेच्या सुमारास  गोलाणी मार्केट जवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला .
. याशोभायात्रेसाठी समितीचे अध्यक्ष किशोर भोसले, कार्याध्यक्ष सचिन नारळे, संयोजक ललित चौधरी, अमित भाटिया, शामकांत सोनवणे, शरद तायडे, देवेंद्र भावसार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला .
जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानमध्ये रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .  यामध्ये पहाटे ४ वाजता काकडा भजन, प्रभु रामांना महाभिषेक यासह ७ वाजता मंगल आरती करण्यात आली . यानंतर ‘पुरोहितांची परंपरा’ या विषयावर ऋषीकेश जोशी, राजेश जोशी, हेमंत धर्माधिकारी यांचे कीर्तन झाले. तसेच १२ वाजता जय श्रीरामाच्या जयघोषात राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला . पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते आरती झाली. दुपारी ४ वाजता सुश्राव्य महिला भजनी मंडळ (मोहननगर) यांची भजन सेवा. सायंकाळी ६ वाजता वेद मंडळ जागर सेवेचा शांतीपाठ तसेच ६.३० वाजता धूपारती व सामुदायिक राम रक्षा स्त्रोत तसेच रात्री नऊ वाजता संस्कार भारतीचे साधक गीत रामायण सादर केले . जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिरात रामनवमी निमित्त रामसेतूची शिळा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तिचे दर्शन करण्यासाठीही गर्दी झाली होती.यावेळी असंख्य भाविकांनी भाविकांनी दिवसभरात दर्शनासह श्रवणाचा लाभ घेतला .भाविकांनी दादा महाराज जोशी यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनीही भेट देऊन दर्शन घेतले.श्रीराम जन्मोत्सवासाठी मंदिरात केळीचे खांब, आंब्याच्या पानांचे तोरण, फुलांच्या माळा व आकर्षक रोशणाईने मंदिर सजवण्यात आले होते. पाळण्याला पान, फुलं, फुगे, यांनी सजविण्यात आले होते.
चिमुकले राममंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा 
जळगावातील नविन बसस्थानकासमोर असलेल्या चिमुकले राम मंदिरात देखिल श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला . दुपारी १२ वाजता श्रीरामाच्या जन्मोत्सवाचे असंख्य भाविक भक्तांनी स्वागत करून रामाचे दर्शन घेतले .  दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखिल करण्यात आले होते .
मुखर्जी उद्यानात महाप्रसाद 
येथील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात महाप्रसादाचे श्रीराम नवमीनिमित्त वाटप करण्यात आले . यावेळी अनेक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला . डॉ. शांताराम सोनवणे यांच्याहस्ते महाआरती करण्यात येऊन पूजा करण्यात आली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनलालशेठ , राजेंद्र पवार, बंटी कोळी, कल्पेश सोनी, सुदाम जोगी,विशाल सोनार, पिंटू व्यास , किसन निकम , युसूफ भाई आदी उपस्थित होते .
 शरबत वाटप 
 नवयुवक कंजर भाट मित्र मंडळ  व सिंगापुर बाईजतफै भाविकांना श्रीराम नवमीनिमित्त सरबताचे वाटप करण्यात आले . यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे , उपमहानगरप्रमुख नेतलेकर , नरेश बागडे ,  नितीन  बागडे ,पकज गागडे , कमल गागडे ,योगीराज मलके, अर्जुन माछरे , सचिन  बाटूगे,  मायकल नेतले, आदी उपस्थित होते .
संस्कार भारतीतर्फे गीतरामायण 
संस्कार भारतीतर्फे सकाळी ८.३० वाजता जुन्या जळगावातील श्री राम मंदिरात गीतरामायणाचा कार्यक्रम झाला . संस्कार भारतीचे संगीत साधक यांनी गीतरामायण सादर केले . यामध्ये प्रा.डॉ. चारुता गोखले राम कथेचे निवेदन निवेदन सादर केले .
आनंद रथाचे आगमन 
अरुणोदय आनंदा श्रम श्री क्षेत्र आनंदवाडी येथील सद‌्गुरुसेवक अरुण काका व अन्नपूर्णा मातेच्या चरण पादुका आनंद रथाचे रविवारी शहरात आगमन झाले . औद्योगिक वसाहतीतील जे-१०७, शिव इंजिनिअरींग येथे सकाळी ९ वाजता चरण पादुका महाअभिषेक, राम नाम उपासनाेचा कार्यक्रम घेण्यात आला . दुपारी १२.१० वाजता भाविकांच्या उपस्थित महाआरती करण्यात आली . . त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . . तसेच सायंकाळी ६ वाजता मू. जे. कॉलेजमागील (प्लॉट नंबर ६) अजय खाचणे यांच्या निवासस्थानी पादुकांचे पूजन करण्यात आले . यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला .
आसोदा येथे भव्य शोभायात्रा 
तालुक्यातील आसोदा येथे श्री राम मंदिरात दुपारी १२ वाजता श्री राम जन्मोत्सव सोहळा साजराकरण्यात आला . यात सायंकाळी श्री राम मंदिर चौक मित्र मंडळासह बजरंग दलातर्फे स्वतंत्र शोभायात्रा काढण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने भाविक महिला सहभागी झाल्या होत्या .  श्री राम मंदिरासह शिवाजी पुतळ्यापासून शोभायात्राला प्रारंभ करण्यात आला .

Leave A Reply

Your email address will not be published.