जबलपूर-कोईंबतूर विशेष गाडीच्या कालावधीत महिनाभर वाढ

0

भुसावळ  (प्रतिनिधी)- प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने जबलपूर-कोईंबतूर या साप्ताहिक विशेष गाडीच्या  कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 02198 अप जबलपूर – कोईंबतूर विशेष रेल्वेगाडी ही शनिवारी गाडीचा कालावधी वाढविण्यात आला असून आता  २९/०२/२०२० वरून २८/०३/२०२० करण्यात आला आहे.

ट्रेन क्रमांक – 02198  डाऊन कोईंबतूर – जबलपूर स्पेशल ट्रेन या गाडीच्या कालावधीत सोमवार  २ मार्च ते ३० मार्च २०२०  पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान गाडी नरसिंगपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, मनमाड, इगतपुरी, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवम, कारवार, कुमाता,  कुंडापुरा, उडुपी, मुल्की , थोकूर, मंगलोर, कसारअगोद,  पय्यानूर, कन्नूर, तेल्लीचेरी, वदाकारा, कालिकट, तिरुर, शोनूर, पालघाट, पोधनूर या स्थानकांवर  थांबेल. गाडिची १ वातानुकूलित २ स्तरीय, ४ वातानुकूलित ३ स्तरीय, ११ स्लीपर आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी.अशी रचना स्थिती असेल .

Leave A Reply

Your email address will not be published.