जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘लोकशाही’चे चांगलं पाऊल ; आ मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :आज चाळीसगाव येथे आमदार श्री मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयांमध्ये दैनिक लोकशाही या  लोकारोग्य दीपावली २०२० विशेष अंकाचे विमोचन आमदार श्री मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या  विशेषांकाचे विमोचन करताना आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की ,दैनिक  लोकशाही च्या लोकारोग्य  दीपावली विशेषांकाचे विमोचन करताना मला विशेष आनंद होत आहे , या अंकात करोना या संसर्गजन्य आजाराविषयी जनतेने  घ्यावयाची काळजी , खबरदारी उपाययोजना ,तसेच इतरही आरोग्यविषयक आजारांची माहिती व त्यांच्या विषयी घ्यावयाच्या खबरदारी विषयी लेख विविध तज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या  अंकातील लेखातील माहितीचा, जनतेला निश्चितच उपयोगी ठरेल तसेच दैनिक लोकशाही  ने जनतेच्या आरोग्याविषयी उचललेले एक महत्त्वाचं पाऊल ठरले आहे.

अशा भाषेत आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करुन दिपावली विशेष अंकास शुभेच्छा दिल्यात. यावेळी दैनिक लोकशाहीच्या लोकारोग्य अंकाचे विमोचन करताना आमदार मंगेश चव्हाण यांच्या सोबत दैनिक लोकशाही प्रतिनिधी व चाळीसगाव तालुका व्रुत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर डी चौधरी, दैनिक लोकशाही चे प्रतिनिधी व चाळीसगाव तालुका व्रुत्तपत्रकार मित्र मंडळाचे सेक्रेटरी एम बी पाटील, नगरपरिषदेचे नगरसेवक भास्कर पाटील दायमा सर योगेश खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.