जगातील १ नंबर पॅरामिलिटरी फोर्समधून देशसेवा केल्याचा अभिमान : माजी सैनिक दिनेश पाटील

0

वरणगाव (प्रतिनिधी) : भारतातच नव्हे तर जगात एक नंबरवर असलेल्या सी आर पी एफ पॅरामिलीटरी मध्ये कार्य करून देशसेवा करून मी सेवानिवृत झालो याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले फुलगांव सैनिक  दिनेश भास्कर पाटील यांनी केले.

जम्मू काश्मीर येथुन हवलदार पदावरून ते २० वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले , सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलगांव येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला , या प्रसंगी वरणगांव पोलीस स्टेशनचे  पो .हे .का  भालशंकर , मझहर पठाण  ,गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

फुलगांव बसस्टंड पासुन घोडयावरून दिनेश पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली , ठिक ठिकाणी औक्षण करण्यात आले. १० जुलै २००० रोजी पुणे येथुन ते सैन्यात दाखल झाले होते , त्रिवेद्रम येथे प्रशिक्षण झाल्यानंतर आसाम, बिहार, छत्तीसगड, राजस्थान व जम्मू काश्मीर येथे त्यांनी कर्तव्य बजावले आहे. ८४ बटालीअन मधुन ते सेवानिवृत्त झाले त्यावेळी कर्नल बी पी यादव , डेप्युटी कमांडेट सुरजित, सुभेदार चव्हाण आदींनी त्यांचा सत्कार केला , विविध ठिकाणी काम करतांना नक्षलवादी , अतिरेकी यांच्या सोबत चकमकीत जिवघेणे प्रसंग आले.

आमचे काही साथीदार यात शहीद झाले परंतु मिशन आम्ही यशस्वी केले असेही त्यांनी सांगितले , युवकांनी शारीरीक व बौद्धीक सराव करून देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावे , कोणतेही काम कर्तव्य म्हणून करावे.  या प्रसंगी विविध संस्था , संघटना व नागरीकांनी दिनेश यांचा सपत्नीक सत्कार केला .

Leave A Reply

Your email address will not be published.