जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी वन विभाग हे ड्रोन कॅमे-याची मदत घेणार

0

यावल (प्रतिनिधी)  : वन विभागामार्फत जंगलात आग लावणा-या संशयितांचा शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक एच. एस.  पद्मनाभा यांनी दिली आहेत.

वन विभागामार्फत जंगलातील वनवा विषयक विविध उपाययोजना करण्यात येत असून अत्याधुनिक ड्रोन तंत्राद्वारे देखरेख ठेवण्याबरोबरच स्थानिक रहिवासी व आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियमित बैठका भीतीचित्रे ध्वनिमुदफीती द्वारे जनजागृती करण्यात येत आहेत. वनवा नियंत्रणाकामी अग्निप्रतिबंधक मजुरांची संख्या वाढविण्यात आलेली आहे. वनवा लावणाऱ्या संशयितांना पकडून देणाऱ्यास पाच हजार रुपये इतके बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या लगत जंगलात आग लागणार नाही त्या समितीस अकरा हजाराचे पारितोषिक जाहीर करण्यात येत आहेत. वनवा नियंत्रणासाठी स्थानिक रहिवाशांच्या सक्रिय सहभागासाठी वन विभागाकडून विनम्र आवाहन करण्यात येत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये वन विषयक संवेदनशीलता निर्माण करून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहेत वनवा नियंत्रणासाठी फायर ब्लोअर ग्रास कटर या मशिनद्वारे जाळ रेषांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जंगल गोष्टीसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची देखील मदत घेण्यात येत आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी वनसंरक्षण तथा जंगल वस्तीसाठी तैनात केली आहेत. वन व नियंत्रणासाठी शीघ्र प्रतिसाद पथके तयार केली असून आरोपी शोध व कारवाई करण्यात येत आहे अस्थाई संरक्षण कॅम्प उभारून वनवा देखरेख नियंत्रण व निगराणी करण्यात येत आहे. गस्ती पथक द्वारे जंगल क्षेत्राचे गोष्टीचे नियोजन वाढविण्यात आलेले आहेत अग्नि संवेदनशील परिसरात गौन वनोपजाचा संकलन व विक्रीवर निर्बंध घालण्याबाबत गंभीर विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

स्थानिक रहिवाशांनी वनवा विषयक माहिती नजीकच्या स्थानिक वन कर्मचारी, अधिकाऱ्यांना देऊन वनवा नियंत्रणासाठी सक्रिय सहकार्य करावे. वनक्षेत्रात पर्यटनावेळी पर्यटकांनी जबाबदारीचे भान ठेवावे.

वणव्याची कारणे

जंगलात महू व उत्पादन अधिक लालसेने,  गुराखी पुढील हंगामात अधिक गवत उत्पादन होणेच्या अंधश्रद्धेमुळे, लगतच्या भागातील शेत बांधावरील राब जाळणे, नकळत जंगलाच्या दिशेने ठिणगी उडाल्यास, वन्य प्राण्यांच्या शिकार करण्याच्या उद्देशाने, पर्यटक अभ्यागाच्या निष्काळजीपणाने ज्वलनशील पदार्थ वनक्षेत्रात  फेकल्याने व अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने होतात.

 

तसेच वणव्याचे परिणाम मौल्यवान वृक्ष संपदेचा व पर्यावरणाचा ऱ्हास, जैवविविधतेची अपरिमित हानी, वन्यजीव व त्यांच्या आदिवासाची हानी होणे, तसेच जमिनीची धूप व उत्पादकता कमी होणे आणि आदिवासी बांधवांच्या दैनिक जीवन मनावर विपरीत परिणाम होणे व मानव-वन्यजीव संघर्ष असे परिणाम होतात.

तसेच जंगलात ज्वलनशील पदार्थ फेकू नये अथवा जवळ ठेवू नये आणि असे करणाऱ्या प्रवृत्तीस परावृत्त करावे व वनालगतच्या परिसरात अथवा वनात वनोपज संकलित करतांना पालापाचोळा जाळू नये रात्री उजेडासाठी थेंबाऐवजी बॅटरी घेऊन जावे वनालगत शेती बांधावरील काडीकचरा निष्काळजीपणाने जाळू नये अशा प्रकारची काळजी करणे गरजेचे आहे . असेही पद्मनाभा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.