अमळनेर तालुक्यातील ८ क्रीडा शिक्षकांचा गौरव

0

अमळनेर : धुळे कलाध्यापक  सोसायटी आणि  क्रीडा व कला शिक्षक  समन्वय समिती तर्फे  छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार  २०२१ वितरण धोंडू श्याम गरुड वाचनालयात  करण्यात आले. यात अमळनेर तालुक्यातील   आठ क्रीडा शिक्षकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील १० वर्षाच्या   कार्याचा  गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी माजी आमदार राजर्वधन कदमबांडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून  प्रो कबड्डीस्टार खेळाडू  महेद्र राजपुत, महापौर चद्रकांत सोनार, नगरसेवक विनायक शिंदे  ,क्रीडा अधिकारी कार्यालयाचे गुरुदत्त  चव्हाण, ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ,क्रीडा संघटनेचे कार्यध्यक्ष संजय पाटील   उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील  प्रा.ए.के अग्रवाल  (प्रताप काॕलेज) ,एस आर बोरसे (माध्यमिक विद्यालय शिरसाळे) ,  आर एल पाटील (आदर्श  वि.अमळगांव ) , आर पी चौधरी  (एकात्मता  मा.वि. शहापुर),  आर. ए. घुगे( विजयनाना पाटील आर्मी स्कुल) , प्रा.प्रितेश तुरणकर   (जय योगेश्वर  वि अमळनेर) , शेख महमद  सादिक  (नॕशनल उर्दृ स्कुल   ) , प्रेरणा वड्याळकर(ग स विद्यालय ) या आठ क्रीडा शिक्षकांचा समावेश आहे.  कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष हेमंत भदाणे , सचिव राहुल पाटील , योगेश वाघ यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय खोखो खेळाडू सुनील वाघ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार  प्रा शिवाजी बाविस्कर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.