चौगाव ग्रामपंचायत निवडणूक ठरणार रंगतदार ; ७ जागांसाठी १५ उमेदवार आमने-सामने

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-परिसरातील जवळपास 3000 मतदारसंख्या असलेल्या चौगाव गावाची 3 प्रभागात विभागणी असून 2 पॅनल मध्ये सरळ लढत रंगणार असून १ अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आजमावत आहे.

चौगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ७ जागांसाठी १५ उमेदवारांमध्ये लढत असून यात १ अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.तत्पूर्वी माघारी नंतर २ उमेदवार कमलबाई राजपूत तसेच गोपाल देविदास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदर निवडणूकीत शिवसेनेचे तालुका संघटक सुकलाल कोळी तसेच पं.स.सदस्य प्रतिभा पाटील यांचे पती भाजप कार्यकर्ते बापूराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला असून या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.