पारोळा येथे नगर पालिके मार्फत प्लास्टिक बंदी मोहीम

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा नगर पालिके मार्फत  ७०ते ८० किलो प्लस्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या याबाबत अधिक माहिती अशी कि पारोळा येथे नव्यानेच रूजु झालेल्या मुख्यधिकारी ज्योती भगत ह्या आज दि,१३ रोजी सांयकाळी आपल्या कुटुंबा सोबत शहरातील  प्रमुख देवस्थान बालाजी मंदिरात दर्शनासाठी जात असतानां त्यांना काही नागरिकांन कढे कॅरिबॅग दिसुन आल्या तेव्हाच त्यांनी आपल्या कर्तुत्वा ची जाणिव ठेऊन नगर पालिके च्या कर्मचार्यांना बोलवले व बाजार पेठेतील  काही व्यापार्यांच्या दुकानाची झडती घेतली असता दुकानदांरा कडे सिंगल युज कॅरी बॅग आढळुन आल्या.

त्या त्यांनी लगेच जप्त करण्याचे आदेश दिले तर काही व्यापार्यांन कडुन दहा हजार रूपये दंड म्हणुन ही वसुल केले अचानक कारवाई झाल्याने व्यापर्यांन सह भजीपाला विक्रते व किराणा दुकानदार तसेच सिंगल युज प्लास्टिक  कॅरिबॅग विक्रेते  यांचे धाबे धनानले  तर मुख्यधिकारी ज्योती भगत यांनी  व्यापार्यांना व शहरातील प्लास्टिक विक्रेते यांना सक्त ताकिद दिली कि या पुढे जर सिंगल युज प्लास्टिक आढळुन आली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत त्यांनी आपल्या कामाची चुनुक दाखवली व एक कर्तव्यदक्ष मुख्यधिकारी पारोळा शहराला पुन्हा लाभल्याचे जाणवले तर दैनिक लोकशाही शी बोलताना मुख्यधिकारी ज्योती भगत यांनी सांगितले कि ही कारवाई पुढे ही निरंतर अशिच सुरू राहाणार आहे म्हणुन व्यापारी भाजीपाला विक्रेते तसेच कॅरिबॅग विक्रेते यांनी कॅरिबॅग चा वापर टाळावा व नगर पालिका प्रशासनास सहकार्य करावे  अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल  यावेळी  नगर पालिके चे कर्मचारी करनिरीक्षक संदिप सांळुखे, किरण कंडारे अभिजित मुंदाणकर, सचिन चौधरी,  विश्वास पाटील,किशोर चौधरी व इतर नगर पालिका कर्मचारी सोबत होते,

Leave A Reply

Your email address will not be published.