‘चोसाका’ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

0

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील चोपडा सहकारी कारखाना गेल्या  दोन वर्षापासून बंद होता. गेली दोन वर्ष कारखान्यातून ऊसाचे गाळपच झाले नाही. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या अनेक वर्षापासून कर्ज पुरवठा स्थगित केले आहे. त्यामुळे बुलढाणा अर्बन को-ऑप बँकेच्या जादा व्याजदराने कर्ज घेवून काही वर्षे संचालक मंडळाने कारखाना सुरु ठेवला होता. तथापि बुलढाणा अर्बन बँकेच्या कर्जाची थकबाकी झाल्यामुळे त्या  बँकेनेही वित्तपुरवठा थांबवल्याने गेल्या दोन वर्षापसून चोपडा सह.साखर कारखान बंद अवस्थेत हेता. काही साखर कारखान्याचे त्यांचा मात्र ऊसाचे उत्पादन कमी असल्याने कारखाना बंद ठेवावा लागतो तथापि चोसाका क्षेत्रात ऊसाचे उत्पादन पुरेसे असतांना सुध्दा केवळ वित्तीय पुरवठा याअभावी कारखाना दोन वर्षे बंद होता. त्याचा  परिणाम चोसाका क्षेत्रातील ऊस उत्पादक त्यांचा ऊस दुसऱ्या कारखान्याना कमी किमतीत विकावा लागत होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत  होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी चोसाका सुरु झाला पाहिजे. ही विद्यमान संचालक मंडळाची तळमळ होती. त्यामुळे खबरदार कारखाना चालविणे शक्य नसते तरी भाडेतत्वावर देऊन कारखाना सुरु व्हावा असा विचार संचालक मंडळाने केला आणि  त्यासाठी पाठपुरावा सुरु केला. गेल्या 6 महिन्यापासून संचालक मंडळ याबाबत अनेक उपाय योजनांबाबत विचार करीत होते. अखेर त्यांच्या इच्छा शक्तीला यश आले. बुलढाणा अर्बन को-ऑप बँकेने सुध्दा त्यांच्या थकित कर्ज परत फेडीच्या अटीवर कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. सदरचे ना हरकत प्रमाणपत्र मिळताच वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन सभासदाकडून भाडे तत्वावर देण्याबाबतचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळताच संचालक मंडळाकडून शासन दरबारी हालचाली सुरु केल्या. चोपडा तालुक्याचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली मंत्रीमंडळ उपासमारीची परवानगी प्राप्त केली. साखर आयुक्तांकडूनही त्याला हिरवा कंदील मिळाला. या सर्व परवानगी मिळाल्यानंतर आता 4 सप्टेंबर 2021 पासून भाडेतत्वावर देण्यासंदर्भात ऑनलाईन निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यामुळे ‘चोसाका’च्या बॉयलर येत्या हंगामापासून पेटणार आहे. त्यामुळे चोपडा तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. आपल्या मालकीचा कारखाना दोन वर्षाचा सुरु बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत होती. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.

चोपडा सह साखर कारखाना सुरु करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाच्या सभासद शेतकऱ्यांनी तर साथ दिली. त्याबरोबरच तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी सुध्दा संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला पाठींबा दिला ही अध्यक्ष जमेची बाजू म्हणता येईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले राजकीय जोडे बाहेर ठेवत. एकत्र आले ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिमानाची व अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल.

राजकारण करण्यासाठी इतर संस्था, संघटना आहेत. तेथे राजकारण करावे त्याला कोणाची ना नाही. परंतु आपला शेतकरी अडचणीत असतांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येवून एक आदर्श महाराष्ट्रात घालून दिला आहे. अशा प्रकारच्या राज्यातील पक्षाच्या सकारात्मक निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होईल. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह.बँक ही शेतकऱ्यांची बँक होय. शेतकऱ्यांच्या निर्माता असलेल्या या जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर अव्वाच्या सव्वा खर्च करून प्रचाराचा धुराळा उडविण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल पालकमंत्र्यांचे सुध्दा अभिनंदन चोपडा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी अरूणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्याम अग्रवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदिपभैय्या पाटील, माजी चेअरमन घनश्याम पाटील, पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे संचालक मंडळाच्या समोर असलेल्या अडचणी दूर झाल्या. कारखान्याचे चेरमन अतुल ठाकरे, व्हा.चेअरमन शशिकांत देवरे, संचालक आनंदराज रायसिंग, प्रविणभाई गुजराथी, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, सुनिल महाजन, प्रभारी कार्यकारी संचालक अकबर शफी पिंजारी यांचे उपस्थितीत पत्रकार परिषदेत ही आनंदाची बातमी दिली.  आता येत्या 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन निविदा उघडण्यात येईल. त्यानंतर करारनामा होऊन कारखाना सुरु होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु होतील. या निर्णयाबद्दल चोसाका संचालक मंडळाचे अभिनंदन.

Leave A Reply

Your email address will not be published.