चोपडा येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

चोपडा येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, याकरीता माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रेरणेने उद्या दि.26 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चोपडा पिपल्स बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, भगिनी मंडळ व इनरव्हिल क्लब,चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय येथे दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपासुन ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मेळावा सुरु राहणार आहे. तरी सर्व युवकांनी दिलेल्या वेळेस आपल्या मुळ कागदपत्रासहित उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे.

या नोकरी महोत्सवाकरीता ऑनलाईन लिंकच्या माध्यमातुन फॉर्म जमा करण्यात आले असून देखील अजूनही फॉर्म जमा करणे सुरु आहे. मात्र काही कारणास्तव ऑनलाईन फॉर्म जमा करु न शकणाऱ्या युवकांकरीता नोकरी महोत्सवाच्या ठिकाणी फॉर्म जमा करण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. असे देखील आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.

या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातुन शेकडो युवकांना रोजगार मिळणार आहे. दहावी पास, दिव्यांग व मुकबधीर आदींनाही या महोत्सवामध्ये खात्रीशीर नोकरी मिळणार आहे. तरी या संधीचा सर्व युवा वर्गाने लाभ घ्यावा, असे आवाहन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.