चीनमध्ये आढळला आणकी एक व्हायरस ; ७ जणांचा मृत्यू

0

बीजिंग – चीनमध्ये गोचिडीमुळे पसरणाऱ्या विषाणूमुळे झालेल्या नवीन संसर्गजन्य आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती अधिकृत माध्यमांनी बुधवारी दिली. या विषाणूचा प्रादुर्भाव माणसाकडून माणसाला होण्याची शक्‍यताही व्यक्त व्हायला लागली आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पूर्व चीनच्या जिआंग्सु प्रांतामधील 37 हून अधिक लोकांनी या “एसएफटीएस’ विषाणूचा संसर्ग झाला आहे. नंतर, पूर्व चीनच्या अन्हुई प्रांतात 23 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले असल्याचे ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

जिन्ग्सू प्रांताची राजधानी नानजिंग येथील एका महिलेला विषाणूमुळे ताप, खोकला ही लक्षणे दिसू लागली. तिच्या शरीरात पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या घटल्याचे डॉक्‍टरांना आढळले. महिनाभर उपचारानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. अहुई आणि पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतात या विषाणूमुळे कमीतकमी सात जणांचा मृत्यू झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

 

“एसएफटीएस’ हा नवीन विषाणू नाही. 2011 मध्ये हा विषाणू वेगळा ओळखण्यात आला होता. या विषाणूचा संसर्ग गोचिडींपासून होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. म्हणून गोचिडींपासून सुरक्षित राहण्याची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.