चिंता वाढली ! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पार

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून काही केल्या कमी होत नाहीय. गेल्या 24 तासांत भारतात 4970 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांहून अधिक झाला आहे. तर आतापर्यंत देशात एकूण 3163 जणांचा कोरोणाने मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाच्या पार्श्वुमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधितांच्या आकडा काही थांबत नाही आहे. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा आता सध्या चौथा टप्पा सुरू आहे. त्यावेळी देशात कोरोनाव्हायरसचे 606 रुग्ण होते. त्यानंतर 14 एप्रिलला पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यावेळी कोरोनाबाधितांच्या संख्या 11 हजार 439 झाली. दुसरा लॉकडाऊन 3 मेपर्यंत चालला. यादरम्यान रुग्णांची संख्या 42 हजार 533 झाली. तर तिसरा लॉकडाऊन 17 मेला संपला. केवळ 12 दिवसात भारतात तब्बल 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत लागू करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.