माऊली फाऊंडेशनच्या वतीने नागरिकांना मोफत होमिओपॅथी औषधी वाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये व लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी माऊली फाउंडेशनच्या वतीने भडगावातील सर्व 40,000 नागरिकांना आर्सेनिक अल्बम ही होमिओपॅथी औषधी मोफत वाटप करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे. मात्र या औषधांचा बाजारात मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याने सध्या थोड्याच प्रमाणात औषधी उपलब्ध झाली आहेत.

तेव्हा सर्वात आधी जे आपला जीव धोक्यात घालून या संकटसमयी सेवा देत आहेत असे नगर परिषद मुख्याधिकारी, सफाई कर्मचारी डॉक्टर, फार्मासिस्ट, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते,जे कामावर रुजू आहेत असे शासकीय अधिकारी , कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, माजी सैनिक, बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी ,आशा व अंगणवाडी सेविका यासारखे इतर घटक, तसेच प्रशासनाकडून कॉरोनटाईन करण्यात आलेल्या व्यक्ती अशाच लोकांना प्राधान्याने औषधी वितरित करण्याचा निर्णय फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर औषधी उपलब्ध होताच पुढच्या टप्प्यात ती लवकरात लवकर सर्वसामान्य नागरिकांना वाटप करण्यात येतील, असे फाउंडेशनच्या वतीने सूचित केलें आहे.

या अभियानासाठी माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी, उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, अजित दुडे मुंबई येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ.दुर्गेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील महाजन सर, देवेंद्र पाटील, योगेश शिंपी सर, हाजी जाकीर कुरेशी, संजय सपकाळे, मनीषा पाटील, आनंद चावरेकर, प्रा.सुरेश कोळी यांच्यासोबत माऊली फाउंडेशन अनेक सदस्य परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.