चिंताजनक ! जिल्ह्यात आज ५४८ नवे बाधित रुग्ण आढळले

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात ५४८ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर आजच २४५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहर आणि बोदवड तालुक्यात प्रत्येक एक असे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ६५० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार ६४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यात आज जळगाव शहरातील ८२ वर्षीय आणि बोदवड तालुक्यातील ५१ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजवर १ हजार ३९६ रूग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- २४८, जळगाव ग्रामीण- ६, भुसावळ-४६, अमळनेर-२, चोपडा-८३, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-८, यावल-०, एरंडोल-३, जामनेर-४५, रावेर-२४, पारोळा-१७, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-० आणि इतर जिल्हे २ असे एकुण ५४८ रूग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.