चाळीसगाव येथे भाजपला रामराम करीत शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

चाळीसगाव :- सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील पक्षांतराची लाट सुरूच असून चाळीसगाव येथे भाजपला रामराम करीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भाजपचे विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील यांचे शालक वडाळा-वडाळी येथील भाजपचे कार्यकर्ते संजय चिंतामण आमले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्न्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यात अशोक आमले, रितेश आमले, रमेश सूर्यवंशी, संदीप आमले, किशोर शेवरे, बाळू आमले, हिलाल अहिरराव आणि बाळू मोरे यांचा समावेश आहे. दरम्यान जळगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी मताधिक्क्याने निवडून देऊ असा निर्धार
कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.