चाळीसगाव पंचायत समीतीच्या वतीने शिक्षकांना ओळख पत्राचे वितरण !

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगांव तालुका पंचायत समीतीच्या वतीने आज जिपच्या शिक्षकाना पंचायत समीतीचे सभापती अजय पाटील याच्या अध्यक्षतेखाली ओळख पत्राचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमासाठी जि .प .सदस्य भाऊसाहेब खंडु जाधव, संजय कापसे (जिल्हा अध्यक्ष रयत सेना), सामाजिक कार्यकर्त संजय चौधरी, शिक्षक सेना तालुका अध्यक्ष विजय निकम (चाळीसगांव), महेंद्र सिसोदे, उमेश चव्हाण, अजीत पाटील (संचालक पारोळा सोसायटी) इत्यादी उपस्थित होते. कोरोना काळात शिक्षकाना अनेकाना ठिकाणी  शासनाने ड्युट्या लावल्या आहेत या साठी ओळखपत्राचा फार उपयोग होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.