पारोळ्यातील कोविड केअर सेंटरमधून १६ जणांना डिस्चार्ज

0

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील जोगलखेडे येथे कोरोना संसर्गित  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक असलेल्या १४ अधिक २ अश्या एकूण १६ जणांना येथील कोविड केअर सेंटर शासकीय आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना रविवार दि १o रोजी दुपारी ५ – ३० वाजता त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती तहसिलदार अनिल गवांदे यांनी दिली.

तालुक्यातील जोगलखेडे येथे मालेगांव हुन आलेल्या कोरोना बाधित पोलिस जावायाच्या संपर्कात आलेल्या १४ व त्यांच्या संपर्कात आलेल्या ४१ जणांना येथील सप्तर्षी मंगल कार्यालयात इन्सिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले होते. वरील ४१ जणांची प्रकृती चांगली झाल्याने व त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याने त्यांना ६ मे रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर उर्वरित १४ अधिक पारोळा १, मंगरुळ १ असे एकूण १६ जणांना येथील शासकीय आय टी आय कॉलेज मध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले होते  वरील १६ जणांची प्रकृती चांगली असल्याने व त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षणे दिसुन न आल्या मुळे त्यांना  दिनांक १० रोजी दुपारी ५-३० वाजता घरी सोडण्यात आले. यावेळी तहसिलदार अनिल गवांदे, शहर तलाठी निशिकांत पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ प्रांजली पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश सांळुखे, डॉ गिरीष जोशी, डॉ. चेतन करोडपती, आदि उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.