चार हजारांची लाच घेताना ग्राहक मंचच्या अधीक्षकाला अटक

0

जळगाव (प्रतिनिधी)- फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे तक्रारदाराच्या वाहनाची जप्ती टाळण्यासाठी राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचचे अधीक्षक घनःश्याम आसाराम सोनवणे (वय ५० रा. मारुती पार्क, शिवकॉलनी) यांना ४ हजारांची लाच घेताना कार्यालयासमाेरच एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले अाहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास उपअधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोना. मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्‍वर धनगर यांनी केली.

तक्रारदार यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून वाहन खरेदी केले होते. या कर्जाचे हप्ते थकीत झाले होते. व वाहन फायनान्स कंपनीद्वारे जप्त करण्याची प्रक्रिया सुरु होती. तक्रार याने त्याचे वाहन जप्त होवू नये यासाठी तसेच स्टे ऑर्डर मिळविण्याकरीता महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवार मंचचे अधीक्षक घनःश्याम आसाराम सोनवणे यांच्याकडे अर्ज केला. सोनवणे यांनी तक्रारदार याला स्टे ऑर्डर मिळवून देण्यासाठी ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार अगोदर अर्थिक अडचणीत असतांना सोनवणे यांनी त्याच्याकडे लाचेची मागणी केल्याने तक्रारदार याने दि.२९ रोजी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेवून त्यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी होवून लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दि.२९ रोजी रात्रीच सापळा रचून राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचचे अधीक्षक घनःश्याम आसाराम सोनवणे यांना तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.