चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा

0

मुंबई / जळगाव :मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मुक्ताईनगर मतदार संघात भाजपाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसंच त्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीच नाही, तर शिवसेना आणि भाजपमधील काही नेते-कार्यकर्त्यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. लेकीच्या पराभवानंतरही खडसे आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवत होते.

विधानसभेत आता एक नाही, तर दोन-दोन चंद्रकांत पाटील असतील. पहिले म्हणजे पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. तर दुसरे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील.
कोणी दिलाय पाठिंबा…

मंजुळा गावित (अपक्ष): साक्री मतदारसंघ (धुळे)
चंद्रकांत पाटील (अपक्ष): मुक्ताईनगर (जळगाव)
बच्चू कडू(प्रहार जनशक्ती पार्टी) : अचलपूर (अमरावती)
राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी): मेळघाट (अमरावती)
आशिष जैस्वाल (अपक्ष): रामटेक (नागपूर)
नरेंद्र भोंडेकर (अपक्ष): भंडारा(भंडारा)
शंकरराव गडाख(क्रांतीकारी शेतकरी पक्ष) : नेवासा
 

Leave A Reply

Your email address will not be published.