चंकी पांडेची एकूण संपत्ती बघून तुम्हाला धक्का बसेल; करतात ‘हा’ व्यवसाय

0

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सध्या खुप जास्त चर्चेत आहे. अनन्याने बॉलीवूडमध्ये जोरदार डेब्यु केला आहे. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. ती लवकरच बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होऊ शकते.

अनन्याने तिच्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. अनन्याचे वडील चंकी पांडे एकेकाळी बॉलीवूडचे यशस्वी अभिनेते होते. आजही ते अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसत असतात. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आजही कायम आहे.

 

बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्ये चंकी पांडेवर अनेक विनोद केले जातात. त्यांच्या काटकसरी स्वभावावर देखील खुप जास्त मस्करी केली जाते. पण खऱ्या आयुष्यात मात्र चंकी पांडे करोडोच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांचे अनेक ठिकाणी मोठे मोठे व्यवसाय आहेत.

 

चंकी पांडे त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात. मुंबईच्या पॉश एरियात त्यांचा आलिशान बंगला आहे. या बंगल्याच्या सजावटीसाठी चंकीने करोडो रुपये खर्च केले आहेत. त्यांचा हा बंगला आतून महालासारखा आहे. या बंगल्याची किंमत ९८ करोड आहे.

 

बंगल्यासोबतच चंकी पांडेकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. चंकीकडे बीएमडब्ल्यू, मारुती सुझुकी अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. दिवसेंदिवस दिवस त्यांच्या गाड्यांची संख्या वाढत आहे.

 

एवढेच नाही तर चंकीचे लंडन आणि अमेरिकेमध्ये देखील बंगले आहेत. ज्यांची किंमत करोडो रुपये आहे. चंकीचे मुंबईसोबत अनेक ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. त्यासोबत त्यांचा करोडो रुपयांचा मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून चंकी महिन्याला करोडो रुपये कमवतात.

Leave A Reply

Your email address will not be published.