ग्रुप ग्रामपंचायत तुळई येथे उच्चशिक्षित महिला झाली उपसरपंच !

0

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेला लागून असलेले तुळई हे गाव एक तालुक्यातील आगळंवेगळं गाव असून हुतात्मा वीर भाई कोतवाल व हिराजी गोमाजी पाटील यांच्या इतिहासाला साक्षी असलेले तुळई हे गाव या गावात वार्ड क्रमांक एक मधून बिनविरोध निवडून आलेल्या उच्चशिक्षित महिला शिक्षण एम, ए, बी ,एड . इतके झालेले असून संपूर्ण गावाने विचार करून एका उच्च विभूषित महिलेच्या हाती.

गावाची उपसरपंच पदाची माळ गळ्यात टाकली असून संपूर्ण गावात आनंदमय वातावरण दिसून येत आहे. त्या स्वतः शिक्षकी पेशा असून त्यांचे पती सुद्धा बृहन्मुंबई महापालिकेत शिक्षक पदावर काम करत असून शिक्षणाने ओत प्रोत भरलेलं हे कुटुंब भावातील सगळ्यांचेच जिव्हाळ्याचे संबंध आहेत गावामध्ये अनेक प्रकारची उच्च विभूषित व्यक्ती असून तालुक्याच्या नकाशावर तुळई गावाचं वेगळे वैशिष्ट आहे. यामध्ये संपूर्ण परिसरात गावात आनंदाचे वातावरण दिसून येत असून सर्व लोकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.