ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन !

0

 ग्रा.प. च्या चाब्या व शिक्के केले गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन

 पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील 85 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी आज सकाळी प स विकास हॉल येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेची बैठक घेऊन क्रांती दिना पासून ग्रामसेवक सवर्गाच्या न्याय मागण्या अनेक वेळा शासन दरबारी लेखी स्वरूपात निवेदन देऊन सुद्धा निकाली न काढल्यामुळे 9 ऑगस्ट 2019 क्रांती दिनापासून ग्रामसेवक सवर्गाच्या न्याय मागण्यांसाठी सहकार मोर्चा धरणे व काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने 22 ऑगस्ट पासून नाईलाजास्तव  प्रश्न सुटेपर्यंत राज्यभरातील 22000 ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन करून सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या चाव्या व स्टॅम्प शिक्के हे गटविकास अधिकारी यांच्याकडे जमा करून काम बंद बाबत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनावर सचिव जितेंद्र रमेश बोरसे,उपाध्यक्ष रावसाहेब आसाराम न्हाहळदे, महिला उपाध्यक्ष श्रीमती वैशाली रोहिदास पाटील, कोषाध्यक्ष नरेश लीलाधर सूर्यवंशी, सहसचिव सुनील तुळशीराम मोरे, महिला संघटक श्रीमती कल्पना शंकर पाटील, संघटक अनिल दौलत मोतीराडे, प्रसिद्धी प्रमुख विवेकानंद गोकुळ पाटील, सदस्य  प्रल्‍हाद नारायण पाटील, प्रल्हाद नारायण पाटील, श्री प्रभू दीपचंद परदेशी ,श्री महेंद्र भानुदास सोनवणे आदीं पदाधिकारी  व सदस्यांच्या सह्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.