मुख्यमंत्री जळगावात दाखल !

0

जळगाव :- भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात दाखल झाले आहे. आ.सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्यांचे खोटेनगर येथे स्वागत केले. सागर पार्क येथे काही वेळात सभा सुरु होणार आहे.

आज सकाळी पारोळा, अमळनेर, धरणगाव येथे महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर जळगाव येथे मुख्यमंत्री पोहचले असून यात्रेचे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.