रोहिणीत घराचे कुलूप तोडून सव्वा पाच लाखाचा ऐवज लंपास

0

चाळीसगाव :-चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील पेटीत ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने सह रोख रक्कम असा सुमारे पाच लाख 23 हजार तीनशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती अशी की रोहिणी तालुका चाळीसगाव येथील योगेश भागवत नागरे हे कुटुंबासह राहतात. दि. 22 रोजी रात्री जेवण केल्यानंतर सर्व कुटुंबीय घराच्या दुसर्या रूम मध्ये झोपलेले असताना रात्री अकरा ते सकाळी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरात ठेवलेल्या लोखंडी पेटीत व तसेच बॅगेतील तीन लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने 26 हजार 800 रुपये किमतीचे चांदीचे दागिने व एक लाख 24 हजार रुपये रोख असा पाच लाख 23 हजार तीनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोन वाजता योगेश नागरे यांना जाग आली असता घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले घरात जाऊन पाहिले असता त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करून भेटीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली पोलिसांनी रोहिणी येथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी योगेश नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन अमोदेकर करीत आहेत दरम्यान रोहिणी येथे या चोरीने गावकर्‍यांमध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.