गॅस टॅंकरला भीषण आग; दोन तास वाहतुक ठप्प

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नॅशनल हायवे क्र. सहावर दसरखेड नजीक असलेल्या अग्रवाल पॅकर्स ॲड मुव्हर्स जवळ भारत गॅसच्या टॅकरला आज सकाळी अकरा वाजता टॅकरच्या कॅबीनमध्ये शार्टसक्रिट होऊन आग लागली.  पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे रौद्ररूप पाहून हायवे पोलिसांनी घटनास्थळापासुन दुतर्फा एक कि.मी.अंतरावरच रस्त्याने ये-जा करणारी वाहने थांबवित न.प.व कृ.उ.बा.समीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

दि. 26 डिसेंबर रोजी मुंबईवरून नागपूरकडे भारत गॅसचे टॅंकर क्र. Mh 04 Ju 7511 निघाले होते. आज दि. 27 डिसेंबर रोजी नॅशनल हायवे क्र सहावरील दसरखेड गावानजीक टॅकरच्या कॅबीनमध्ये शार्टसक्रिट होऊन आग लागली. या आगीत टॅकरची कॅबीन संपूर्ण जळून खाक झाली. वेळीच न. प. अग्नीशमन दलाचे वासुदेव भोपळे घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.  त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आगीमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पो. उप. नि. उज्जैनकर, ऐ. एस. आय जय भाऊ खोडे, पो. ना. दिपक पिटकर, पो. ना. सुनील राठोड, पो.काॅ. मिलिंद ताकतोडे, पो.काॅ.  योगेश शेळके, पो.काॅ. हरिओम काकडे, पो.काॅ. संदीप किरकी, पो.काॅ अरुण भुतेकरसह दसरखेड ग्रामीण, शहर पोलिसांनी वाहतुक सुरळीत सुरू केली, शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे,एकता हाॅटेल चे  सुभाष खाटिक, युवराज रायपुरे आदींनी मदतकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.