गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड 1 जूननंतरच करावी – संभाजी ठाकूर

0

जळगाव | कापूस हे जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पिक आहे. शासनाने कापूस बीजी-1 या पाकिटाची किंमत 635 रुपये तर बीजी-2 या वाणाच्या पाकिटाची किंमत 730 रुपये अशी निर्धारित केली आहे. कापूस बियाणे जरी बाजारात लवकर उपलब्ध झाली असली तरी शेतकऱ्यांनी बागायती कपाशीची लागवड 1 जूननंतरच करावी. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कापुस बियाणे पाकिटे शेतकरी बांधवांना 25 ते नंतर उपलब्ध होणार आहे. कोरोना (कोविड -19) चा जिल्ह्यात प्रादुर्भाव पाहता शेतकरी बांधवांनी बियाणे/खते/किटकनाशके खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी न करता शेतकरी गटामार्फत घ्यावे. यामुळे त्यांना बांधावर निविष्ठा उपलब्ध होणार असून कृषी सेवा केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही, याकरीता संबधीत कृषी विभागाच्या अधिकारी/ कर्मचा-याशी संपर्क साधावा.

तरी कापूस बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांचे बागायती कापूस लागवडीविषयी योग्य ते प्रबोधन करावे. वियाणे विक्रेत्यांनी शासनाच्या परवानगीशिवाय कापूस बियाणाची विक्री शेतकऱ्यांना केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.