गुंगीचे औषध देवून कोथळी येथे घरफोडी

0

मुक्ताईनगर :- तालुक्यातील कोथळी येथे बेशुद्ध करुन घरातून सहा ग्रॅम सोने व सात हजार रुपये रोख असा ऐवज लुटून नेल्याची घटना १३ जूनला रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, चोरट्यांमध्ये महिलेचा समावेश आहे.

कोथळी गावातील हनुमान मंदिराच्या मागे राहात असलेल्या पवन विलास खडसे यांच्या घरात १३ जूनच्या रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान अनोळखी महिला व चोरट्यांनी घरफोडी करत सहा ग्रॅम सोने आणि सात हजार रुपये रोख असा ऐवज लुटून नेला आहे. तक्रारदार पवन खडसे यांची पत्नी नम्रता यांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान लघुशंकेसाठी बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला असता त्याचवेळी अज्ञात महिलेने येऊन तोंडावर काहीतरी लावून गुंगीच्या औषधाने नम्रता खडसे यांना बेशुद्ध केले. यादरम्यान दरवाजा उघडा असल्याने संधीचा फायदा घेत अज्ञात चोरटी महिला आणि इतर चोरट्यांनी घरात घुसून कुलूप न लावलेल्या कपाटात ठेवलेले सहा ग्रॅम सोने आणि सात हजार रुपये रोख चोरून पोबारा केला. पोलीस पाटील संजय चौधरी यांनी रात्री उशिरा पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर तपास चक्रे फिरण्याच्या दृष्टिकोनातून सकाळीच लवकर श्वानपथक कोथळीत दाखल झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.