गिरणा नदीपात्राजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथील तरूणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दापोरी गावाजवळील शेताजवळ गिरणा नदीच्या काठाजवळ गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रवंजे बुद्रुक येथील तान्हु उर्फ आबा कौतिक सोनवणे (वय ३६) या युवकाचा मृतदेह आढळून आला.

याबाबत कुंदन सखाराम कोळी यांनी पोलिस पाटील सखाराम तान्हू सोनवणे यांना माहिती दिली. तर रवंजे येथील दशरथ ओंकार कोळी, उमाकांत महारु कोळी यांनी मृतदेह बाहेर काढला. याबाबत सोनवणे यांच्या माहितीवरून एरंडोल पोलिसात नोंद केली आहे.

त्याच्या पश्चात कुटुंबात आई,पत्नी व २लहान मुले आहेत. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून घरातील कर्ता पुरूष सोडून गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.