गिरणा धरणातून 4 दिवसांत आवर्तन सुटणार

0

पाचोरा – भडगावसह अनेक गावातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा : सध्यस्थितीत 327.00 मिमी साठा

जळगांव -दि.9-
जिल्ह्यातील अनेक गावांना या वर्षी अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे कृषि उत्पादनावर परीणाम झाला होता. तर त्या अनुषंगाने पाणीटंचाईस देखिल सामोरे जावे लागत आहे. जिल्हयातील काही तालुक्यांसह अनके गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. गिरणा धरणातुन दिवाळीच्या दिवसात पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. दुसरे आवर्तन येत्या तीन चार दिवसात सोडण्यात येणार आहे. असे प्रशासनसुत्रांनी सांगीतले . त्यामुळे गिरणा पट्टयातील चाळीसगाव, पाचोरा, भडगांवसह अनेक गावांना पाणीटंचाईपासून तुर्त काही काळ दिलासा मिळणार आहे.
46 गावांसाठी 28 टँकरव्दारे पाणी पुरवठा
सद्यस्थितीत जिल्हयातील 46 गावासाठी 28 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 73 गांवासाठी 75 विहीर अधिकग्रहण प्रस्ताव, 6 गावासाठी 6 तात्पुरती पाणीपुंरवठा योजना, 22 गांवासाठी 37 विंधण विहीरी, 3 गांवासाठी विहिर खोलीकरण, तर चोपडया तालुक्यात एका गांवासाठी नळ पाणी पुरवठा योजना दुरूस्ती ची कामे मंजुर करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कमी पर्जन्यमानामुळे यावर्षी सर्वच नदीनाल्यांना पाणीच वाहून निधाले नसल्याची परीस्थिती होती. जिल्ह्यातील बरेच तालुक्यासह ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे पाचोरा भडगांवसह काही तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी गिरणा धरणाच्या आवर्तनाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आढावा घेवून प्रस्तावनुसार पाच आवर्तने पिण्याच्या पाण्यासाठी मंजुर करण्यात येवून टप्प्याने ठराविक कालावधीनंतर सोडण्यात येणार असल्याचे सांगीतले होते त्यानुसार दिवाळीच्या कालावधीत पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. त्या आवर्तनाचे पाणी आतापर्यत टिकले होते .
भडगांव शहरात नियोजन तर पाचोर्‍यात नियोजनाअभावी पाणीटंचाई
भडगाव शहरासाठी पाणीपुरवठा टंचाई निवारणार्थ गिरणा नदी पात्रात गिरणा पाटबंधारे वसाहतीनजीक तत्कालीन सरपंच कै. अविनाश पवार यांच्या प्रयत्नातुन कच्चा बंधारा मंजुर करून उभारणी करण्यात आली होती. त्या बंधार्‍यावर वेळोवेळी तत्कालीन ग्रामपंचायत कालावधीत व विद्यमान नगरपालिका प्रशासनाकडून निधीची तरतुद करून दुरूस्ती करण्यात येते. या बंधार्‍यातुन भडगांव नगरपालिकेने योग्य नियोजन करून पाणीटंचाई दुर केली आहे तर पाचोरा शहरात पाणी पुरवठयाचे नियोजनच अधिकारी व पदाधिकारी यांचा योग्य समन्वय नसल्याने विस्कळीत झाले आहे. पहीले आवर्तन सुटण्याअगोदर पाचोरा शहरात पंधरा ते वीस दिवस पाणीपुरवठा लांबला होता. त्यामुळे नागरीकांना मानवनिर्मीत पाणीटंचाईस सामोरे जावे लागले होते. पाचोरा शहरात तीन ते चार ठिकाणी मोठे जलकुंभ आहेत. या जलकुंभांवरून संपुर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.
भडगांवात केवळ 35 ते 45 मिनिटे तर पाचोरा शहरात तीन ते चार तास पाणीपुरवठा
भडगांव शहरात सन 2000 नंतर पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर तत्कालीन काळात ग्रा.प. प्रशासन व विद्यमान स्थितीत नगरपरीषद प्रशासन पदाधिकारी यांच्या योग्य समन्वय साधुन तीन ते चार दिवसाआड केवळ 35 ते 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात येवून पाणी टंचाईवर मात केली जात आहे. तर पाचोरा शहरात अनेक परीसरात नियोजनाअभावी तीन ते पाच दिवसाआड तीन तीन तास पाणीपुरवठा केला जात होता. यामुळे अनेक गल्लीपरीसरात आवश्यकता नसतांना नळ सूरू ठेवून अंगण परीसरातील गाडया, दुचाकी चारचाकीसह अन्य वाहने देखिल धुण्यासाठी पाण्याचा अनाठायी वापर केला जात असल्याने सद्य स्थितीत गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अनेक परीसरात पाचोरा शहरातील नळांना पाणीच सोडण्यात आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.