गिरड येथील सेवानिवृत्त जवान भागवत शिंपी यांचे खान्देशी रक्षक संस्थेतर्फे जंगी स्वागत

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  गिरड ता. पाचोरा येथील मुळचे रहिवासी भागवत विठ्ठल शिंपी हे सिग्नल कोर मधुन १९ वर्ष प्रदिर्घ सेवा बजवुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा पाचोरा येथे खान्देशी रक्षक संस्था तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातुन व गिरड गावातुन ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

तसेच भागवत शिंपी यांना खान्देशी रक्षक संस्थे कडुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खान्देशी रक्षक संस्थेचे संस्थापक सचिन पाटील, सपोर्टर अध्यक्ष अभिमन्य जाधव, चाळीसगाव तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, संस्था सल्लागार दत्तात्रय पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष सौमित्र पाटील, प्रवक्ता भुषण पाटील, प्रमोद पाटील, अनिल पाटील, रविंन्द्र पाटील, सुनिल पाटील, धनराज पाटील, कैलास पाटील, रविंद्र पाटील सह मान्यवर उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.