गिरड येथील महिलेचा सर्प दंशाने मृत्यू

0

पाचोरा | प्रतिनिधी
गिरड ता. भडगांव येथील ३२ वर्षीय महिला सरपन गोळा करण्यासाठी गेली असता सरपन जमा करित असतांना महिलेस विषारी सर्पाने दंश केला. महिलेने सदरचा प्रकार गावातील नागरिकांना सांगितला. तिला लागलीच गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. व तेथुन पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात आणले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने भडगाव पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, गिरड ता. भडगाव येथील आशाबाई अशोक भिल वय – ३२ ही दि. २० रोजी दुपारी ४ वाजता  गावातील इतर महिलांसोबत गावालगतच्या शिवारात सरपन गोळा करण्यासाठी गेली असता सरपन गोळा करित असतांना आशाबाई हिला विषारी सर्पाने डाव्या पायाच्या अंगठ्याजवळ चावा घेतला. आशाबाई हिने लागलीच गावात येवुन सदरचा प्रकार नागरिकांना सांगितला. तिला गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आशाबाई हिचा मृत्यू झाला. आशाबाई हिला पतीने ८ वर्षांपूर्वीच टाकुन घातले आहे. आशाबाई हिस दोन मुली, दोन मुले, वृध्द आई असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.