गितांजली केमीकल्स स्फोटातील एका जखमीचा मृत्यू

0

जळगाव, दि.12 –
शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या गितांजली केमीकल्समध्ये झालेल्या स्फोटातील एका जखमीचा शुक्रवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
गितांजली केमीकल्समध्ये गेल्या आठवड्यात ब्रोमीन केमीकल तयार करताना कॅटलवर प्रेशर येवून स्फोट झाला होता. यामध्ये 9 कर्मचारी जखमी झाले होते. त्यापैकी 6 कर्मचार्‍यांची प्रकृती गंभीर होती. त्यातील तीन कर्मचार्‍यांना उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास उपचार सुरू असताना गणेश बन्सीलाल साळी रा.चिंचपुरा, पिंप्राळा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
तपासाधिकारी उपनिरीक्षक एन.बी.सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता रूग्णालयातून कागदपत्रे आल्यानंतर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.