गाळण येथे घेतली दारु न पाडण्याची व न पिण्याची शपथ

0
पाचोरा  प्रतिनिधी
     गाळण बु”, विष्णुनगर, हनुमानवाडी व गाळण खु” येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारुचे गाळप होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे गावात महिलांनी एक बैठक घेऊन हिरकनी गृपची स्थापना करुन दि. १० फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दारुबंदीसाठी निवेदन सादर केले होते. दरम्यान दि. १७ रोजी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचे तोंडी आदेशानुसार प्रशिक्षणार्थी पी. एस. आय. विजया वसावे, पुरवठा नायब तहसिलदार पुनम थोरात, मंडळ अधिकारी दिलीप पवार यांनी विष्णुनगर येथे संबंधित महिला व दारु गाळप करणाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीस दारु पाडणाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. व उपस्थितीतांनी दारुमुळे होणाऱ्या परिणामाची जाणिव करून दिल्यानंतर दारु न पाडण्याची शपथ घेतली. यावेळी जिजाबाई राठोड, सरपंच संतोष राठोड, सविता पाटील, कल्पना राठोड, सरला पाटील, मिराबाई राठोड, शांताबाई राठोड, कुमुदिनी राठोड, डॉ. विजयसिंग राजपुत, बी. के. पाटील उपस्थित होते. बैठकीत सरपंच यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस मित्र पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात पोलिस पाटील विनोद राठोड, आकाश राठोड, मनोज राठोड, निंबा राठोड, सजन चव्हाण, दिपक चव्हाण, चेतन राठोड, देवेंद्र पवार, अमोल राठोड, सचिन राठोड, रोहित राठोड यांची वर्णी लावण्यात आली. या पथकाने गावात दारुचे गाळप व विक्री होत असल्यास यावर लक्ष ठेवुन सदरची माहिती वरिष्ठांना कळविण्याचे ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.