गळफास घेवून शिरसोलीतील तरूणाची आत्महत्या

0

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील ३४ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज २४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली. समाधान कडू बारी (वय-३४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शिरसोली गावात गळफास घेवून आत्महत्या करण्याची तीन दिवसात ही तिसरी घटना आहे.

समाधान बारी हा आपल्या पत्नी व मुलासह शिरसोली येथे वस्तव्याला आहे. शेतीचे व मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावातचे त्याचे दुसरे घर आहे. त्याच ठिकाणी रात्री झोपायला जातात. आज सकाळी घरी येवून अंघोळ करून पुन्हा दुसऱ्या घरी गेले. बराच वेळ झाल्यानंतर घरी न आल्याने घरचे सदस्य दुसऱ्या घरी गेले असता समाधान यांनी घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी ७ वाजता उघडकीला आला. मृतदेह तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई अंजनाबाई बारी, पत्नी दिपाली, सहा वर्षाचा मुलगा दुर्गेश, लहान भाऊ असा परिवार आहे. याघटनेची एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.