गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या माजी विद्यार्थ्याने स्वर्गीय मुलाच्या स्मरणार्थ जपले समाजभान

0

शेंदुर्णी : अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णीचे माजी विद्यार्थी पि.के. कोटेचां महिला  महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीपकुमार मदनलाल ललवाणी राहणार भुसावळ यांचे चिरंजीव स्वर्गीय स्वप्नीलकुमार ललवाणी यांचे हृदयविकाराने मुंबई येथे ऑक्टोबर महिन्यात दुःखद निधन झाले. खूप मोठा दुःखाचा डोंगर ललवाणी कुटुंबावर कोसळला. या दुःखातून सावरत आपल्या स्वर्गीय मुलाचे आठवण म्हणून आणि त्याला खरी श्रद्धांजली म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहकार्य होईल या भावनेने प्रा. दिलीप ललवाणी यांनी रुपये पन्नास हजारचा धनादेश आणि रुपये पंधरा हजाराची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ महाविद्यालयाकडे समर्पित केली.

समर्पित 50,000 रुपयाच्या रकमेची ठेव बँकेत करून त्यातून आलेल्या व्याजाच्या रकमेतून दरवर्षी स्वर्गीय स्वप्निल तसेच महाविद्यालयातील माजी प्राध्यापक यांच्या नावाने महाविद्यालयातून प्रथम येणारे विद्यार्थी, ग्रंथालयात नियमित असणारा विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट स्वयंसेवक असे एकूण 10 पारितोषिके देण्यात येणार आहेत. ललवाणी सर वाणिज्य विभागाचे प्राध्यापक असल्यामुळे वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त असे पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ वाणिज्य विभागाला देण्यात आले.  संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड, सचिव श्री.सतीश चंद्र काशीद, महिला संचालिका सौ उज्वलाताई काशीद, सहसचिव श्री. दीपक गरुड, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य यांनी कै. स्वप्निल ललवाणी यांच्या श्रद्धांजलीचा आणि सरांनी केलेल्या कार्याचा आभाराचा ठराव संस्थेमार्फत केला.

भुकेल्याला अन्न मिळावे ,तहानलेल्यास पाणी

जगा व जगू द्या हीच मानवतेची वाणी,… अशी मानवतेची वाणी जपत परिवारातील श्री कांतीलाल शेठ ललवाणी, डॉ. जीवनजी कटारिया, श्री उर्मिलजी ललवाणी यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर राहून धनादेश आणि पुस्तक समर्पण केले. डॉक्टर कटारिया यांनी आपल्या मनोगतात ललवाणी परिवार दातृत्व भावनांचा आढावा घेत परिवाराची यामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग प्रमुख, उपप्राचार्य प्रा डॉ. श्याम साळुंखे यांनी ललवाणी परिवाराचे आभार मानत प्राप्त रकमेतून दिली जाणारे पारितोषिक त्यांची विभागणी आणि वाटप यासंदर्भातला ओहापोह केला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ वासुदेव आर पाटील यांनी दिलीपजी ललवाणी सर आणि कुटुंब यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत असे कार्य समाजाला एक नवीन दिशा देऊन जाणारे आहे .यातून खूप काही शिकण्यासारखे आहे अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता चौधरी यांनी केले. माजी विद्यार्थी संघ आणि वाणिज्य विभाग यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री. हितेन्‍द्र कुमार गरुड, सदस्य उपप्राचार्य प्रा. एन एस सावळे, उपप्राचार्य डॉ. एस डब्ल्यू भोळे,उपप्राचार्य प्रा. आर जी पाटील, कार्यालय अधीक्षक श्री.सतिष बाविस्कर, प्राध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधु उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.