गणेशपूर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान ; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- नानाभाऊ कोकरे

0

खामगाव(प्रतिनिधी) : तालुक्यातील गणेशपूर परिसरात 16 जून रोजी दुपारी 5 वाजताचे सुमारास अतिवृष्टी झाली़ यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात नमुद केल्यानुसार 16 जून रोजी दुपारी गणेशपूर परिसरात सुमारे दीड तास चाललेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे़ मोहाडी नदीला पूर आल्याने गणेशपूर सह परिसरातील शिराळा येथील शेतकयांच्या नदीकाठच्या शेतजमिनी वाहून गेल्याने खरडल्या आहेत़ तर बºयाच शेतांमध्ये पाणी साचले आहे़ बहुतांश शेतकयांनी पेरणी केलेली असल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे़ तसेच नदीवर लावलेले मोटारपंप पुरात वाहून गेले आहेत़.

शेतकरी अस्मानी सुलतानी संकटामुळे आर्थिक अडचणीचा सामना करीत असतानाच त्यात कोरोना महामारीने भर घातली आहे़ अ़़शातच आता अतिवृष्टीचा फ टका बसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे़ त्यामुळे शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे असून त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विनंती शेतकयांच्या वतीने निवेदनात केली आहे, निवेदनाच्या प्रतिलिपी कृषिमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविल्या आहेत़

Leave A Reply

Your email address will not be published.