जिल्ह्यात आजपर्यंत 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद

0

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे. हा पाऊस पेरणीपूर्व मशागत व पेरणीसाठी पुरक ठरणार असला तरी तो पेरणीसाठी पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषि विभागाने केलेले आहे.

कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. तर जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.7 मिलीमीटर इतके असून आतापर्यंत जिल्ह्यात 49.9 मिलीमीटर म्हणजेच जून महिन्याच्या सरासरीच्या 40.7 टक्के इतका पाऊस पडला आहे.

जिल्ह्यासाठी जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय आज (17 जून, 2021) पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जून महिन्याच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 51.7 मिलीमीटर (38.2 टक्के), भुसावळ- 49.00 मि.मी. (40.5), यावल- 49.5 मि.मी. (38.9), रावेर- 38.1 मि.मी. (30.4), मुक्ताईनगर- 37.1 मि.मी. (36.2), अमळनेर- 11.2 मि.मी. (9.8), चोपडा- 19.6 मि.मी. (15.4 टक्के), एरंडोल- 44.1 मि.मी. (36.5), पारोळा- 86.4 मि.मी. (70.3), चाळीसगाव- 105.2 मि.मी. (81.5), जामनेर- 66.9 मि.मी., (48.5), पाचोरा- 50 मि.मी. (43.2), भडगाव- 47.6 मि.मी. (37.3) धरणगाव- 56.9 मि.मी. (40.6), बोदवड- 24.2 मि.मी. (19.5) याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 49.9 मि.मी. म्हणजेच 40.3 टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.